Mumbai Crime : मला ब्लॉक का केलं...असे विचारताच महिलेचा पती व तरुणाचा राडा

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावरील घटना; छेड काढणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
mumbai crime accused molest women kalyan police register case social media block
mumbai crime accused molest women kalyan police register case social media blocksakal
Updated on

डोंबिवली - कल्याण जवळील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर एक महिला पतीसह उभी होती. पती पाण्याची बाटली आणायला गेला तेवढ्यात एक तरुण महिलेजवळ आला आणि त्याने तिला "तु मला ब्लॉक का केले" असे विचारले. तेवढ्यात महिलेचा पती तिथे आला आणि दोघांमध्ये जोरदार राडा झाला.

महिलांशी छेडछाड, गैरवर्तन असे प्रकार रेल्वे स्थानक दरम्यान घडत असून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची त्वरित दखल घेत महिलेची छेड काढणार आणि तिच्या पतीसोबत हाणामारी करणारा तरुण रोहित गायकवाड याला अटक केली आहे. रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

उल्हासनगर मध्ये राहणाऱी एक महिला तिच्या पतीसोबत डोंबिवलीला जाण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात पाोहचली. संध्याकाळी साडे चार वाजता पती पत्नी गाडीच्या प्रतिक्षेत होते. यावेळी पती पाण्याची बाटली घेण्याकरीता कॅन्टीनकडे गेला.

mumbai crime accused molest women kalyan police register case social media block
Mumbai Crime : रिकामे सिलेंडर भंगारात विकणार तोच पोलिसांची पडली नजर; आरोपी अटकेत

याचवेळी एक तरुण महिलेच्या जवळ आला. त्याने तू मला ब्लॉक का केले अशी महिलेला विचारणा केली.. याच दरम्यान तिचा पती तिथे आला आणि पतीने त्याला जाब विचारला. यातून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. नागरीकांनी त्यांची हाणामारी सोडविली.

mumbai crime accused molest women kalyan police register case social media block
Mumbai Crime News: 'वरळी सी फेस' वर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह, हातपाय तोडलेले

या प्रकरणी विठ्ठलवाडी स्टेशनवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने रोहित गायकवाड या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

कल्याण जीआरपी पोलिसांनी रोहीत गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. बूुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.