
बोरिवलीतील एका लग्नाच्या हॉलमध्ये वऱ्हाडी म्हणून प्रवेश करून नवविवाहित वर-वधूंना देण्यात आलेल्या मौल्यवान भेटवस्तू चोरी करणाऱ्या एका2059 टोळीचा एमएचबी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मानव नोजल सिसोदिया या २१ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी गुरुवारी (ता. ६) अटक केली. तो सध्या पोलिस कोठडीत आहे.