मुंबई : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested
मुंबई : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई : मुंबईच्या अॅंटॉप हील परिसरात (Mumbai antop hill) मेथाक्यूलॉन अमली पदार्थ (Methaqualone drug) बाळगणाऱ्या तीन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai crime branch) युनिट एकने अटक केली आहे. हे अमली पदार्थ जवळपास १६ कोटी १० लाख रुपये किंमतीचं असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या खबरीनंतर अमली पदार्थ प्रकरणात तिघांवर (three culprit arrested) कारवाईचा बडगा उगारण्यात आला. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Mumbai crime branch police arrested three culprit in possession of methaqualone)

हेही वाचा: NCPचे सिद्धार्थ कांबळे मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष; तर उपाध्यक्षपद भाजपकडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेला अमल पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तींची खबर मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या तीन जणांना अँटॉप हील परिसरातील बुधवारी सायंकाळी एसएमडी रस्त्यावर अडवलं. त्यावेळी त्यांच्याकडे १६.१०० किलोचा मेथाक्यूलॉन अमली पदार्थाचा साठा सापडला. त्याची किंमत तब्बल १६ कोटींच्या घरात आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newscrime update
loading image
go to top