चेंबूर रोडवरून ५ कोटींचे ड्रग्स जप्त, नायझेरियन नागरिकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs

चेंबूर रोडवरून ५ कोटींचे ड्रग्स जप्त, नायझेरियन नागरिकाला अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) ४ च्या पथकाने मोठी कारवाई केली असून ५ किलो २०० ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहे. चेंबूर-शिवडी बेस्ट डेपो येथे शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या ड्रग्सची (Drugs) किंमत जवळपास ५ कोटी ४० लाख असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी एका नायझेरियन नागरिकाला अटक करण्यात आली.

हेही वाचा: ...अन् शवागाराच्या फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत माणूस ७ तासानंतर झाला जीवंत

एक नायझेरियन नागरिक दिल्लीहून ड्रग्स घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी चेंबूर-शिवडीच्या बेस्ट बसच्या डेपोमध्ये छापा टाकला. यावेळी हा व्यक्ती विशिष्ट प्रकारच्या पर्समध्ये ५०० ग्रॅमच्या पुड्या बनवून विकत होता. पोलिसांना संशय आल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून ५ किलो एमडी आणि २०० ग्रॅम कोकेन आढळून आले. त्याची किंमत ५ कोटी ४० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी ड्रग्ससह नायझेरियन नागरिकाचा पासपोर्ट जप्त केला असून अधिक माहिती गुन्हे शाखेचे पोलिस घेत आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या चालू वर्षात अंमली पदार्थ तस्करीविरोधात ५०० गुन्हे नोंदवले असून ६२० जणांना अटक केली आहे, तर आरोपींकडून ४ हजार किलोचे ड्रगस जप्त करण्यात आले आहेत. १३५ कोटी या ड्रग्जची किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top