Nirmal Nagar Police Station, where a father was arrested under POCSO Act for molesting his daughter. Mumbai crime news highlights a shocking family tragedy
mumbai crimeesakal

Mumbai Crime: दारुच्या ग्लासमध्ये पाणी न ओतल्‍याने जन्मदात्या पित्याने केला लेकीचा विनयभंग

Father accused of molesting underage daughter: याप्रकरणी मारहाणीसह विनयभंग आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून निर्मलनगर पोलिसांनी ४७ वर्षांच्या आरोपीस अटक केली आहे.
Published on

अंधेरी, ता. १३ (बातमीदार) ः दारूच्या ग्लासमध्ये पाणी ओतले नाही, म्हणून एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच पित्याने अश्‍लील शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मारहाणीसह विनयभंग आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून निर्मलनगर पोलिसांनी ४७ वर्षांच्या आरोपीस अटक केली आहे.

अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. शुक्रवारी (ता. १०) उघडकीस आलेल्या या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ४० वर्षांची तक्रारदार महिला आरोपी पती आणि चौदा वर्षांच्या मुलीसोबत खार परिसरात राहते. पीडित मुलगी याच परिसरातील एका खासगी शाळेत नववीत शिकते.

७ जानेवारीला तिचे वडील घरात मद्यप्राशन करत होते. या वेळी त्याने मुलीला दारूच्या ग्लासमध्ये पाणी ओतण्यास सांगितले. नकार दिल्‍यानंतर मुलीला अश्‍लील शिवीगाळ केली. स्टिलच्या भांड्याने आणि हाताने बेदम मारहाण केली. गुन्हा दाखल होताच शनिवारी (ता. ११) रात्री त्याला पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com