Mumbai Crime : सीबीआय चौकशी करा; वसतिगृह हत्या प्रकरणातील मृत मुलीच्या वडिलांची मागणी

CBI
CBIesakal

मुंबई : दक्षिण मुंबईतील सावित्रीबाई फुले सरकारी वसतिगृहात झालेल्या तरूणीच्या हत्या प्रकरणात आता सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. मृत मुलीच्या वडिलांनी गुरुवारी प्रकरण सीबीआयकडे चौकशी देण्याची मागणी केली.

CBI
Nagpur News : अजब! ३२ तासांच्या उपचारानंतर वाचला, तरी ‘तो’ म्हणतो मला सर्पदंश झालाच नाही

सध्याचा तपास निःपक्षपाती नसल्याचे सांगत निष्पक्ष तपासासाठी प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. मृत तरूणीच्या कुटुंबीयांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी गुरूवारी भेट घेतली होती. या भेटी दरम्यान वसतिगृहाच्या वॉर्डनसह या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे कुटुंबीयांनी केली.

आरोपीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, परंतु आरोपीचा चेहरा दिसत नसल्यामुळे आरोपीची ओळख पटवता येत नसल्याचे मृत मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात जाऊन मृत तरुणीच्या नातेवाईकांची भेट घेतली.

CBI
Kolhapur riots : नागपूर SITचा 'तो' अहवाल खुला करा, मग कळेल दंगली...; आंबेडकरांची मागणी

कुटुंबीयांचे आरोप

मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनीही वसतिगृह प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर आमच्या मुलीला एकटे का ठेवण्यात आले होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत वसतिगृहातील सात ते आठ कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. पालकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा आग्रह धरला व मुलीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता.

गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत ते या निर्णयावर ठाम होते. त्यानंतर त्यांची समजूत काढण्यात यंत्रणांना यश आले. मुलीच्या वडिलांनी सायंकाळी मृतदेह स्वीकारला व चैत्य भूमी येथे सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजतादरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com