Mumbai Crime : परदेशात नोकरीचे अमिष, खोटी कागदपत्रे, एजेंटद्वारे केली अमेरिकन काऊंसिलेटची फसवणूक

परदेशात नोकरीचे अमिष दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्या आरोपी एजेंट विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.
crime case
crime casesakal
Summary

परदेशात नोकरीचे अमिष दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्या आरोपी एजेंट विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.

मुंबई - परदेशात नोकरीचे अमिष दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्या आरोपी एजेंट विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. केरळचा रहिवासी असलेला पिडीत आणि अमेरिकन काऊंसिलेटच्या तक्रारीवर बीकेसी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणात फिर्यादी आलफिन राफिल, केरळ राज्यातील त्रिशुर जिल्ह्याचे रहिवासी आहे. त्यांचे वडील शेतकरी असून त्याच्या न मिळणा-या उत्पन्नातुन आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आलफिन राफिल, अरनाकुलम येथे हॉटेलमध्ये चार वर्षापासून शेफ म्हणुन नोकरी करत आहे.

crime case
Mumbai Crime : बुकी अनिल जयसिंघानी, अनिक्षा जयसिंघानीची रवानगी पोलीस कोठडीत

पिडिताची परदेशात नोकरी करण्याची इच्छा असल्याने 20022 मध्ये त्यांनी पासपोर्ट बनवले होते. ते काम करीत असलेल्या हॉटेलच्या जवळच बमदक नावाची परदेशात नोकरी देणारी कंपनी ऐरनाकुलम या ठिकाणी होती. सदरची कंपनी त्यांच्या मार्फतीने लोकांना परदेशात कामासाठी पाठवित होती. पिडीत आलफिन राफिल याना परदेशात काम करण्याची ईच्छा असल्याने त्यांनी कंपनीच्या ऑफिसचे अधिकारी नामे सुनील कृष्णन व त्याचा सहकारी विकास यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी पिडीत व्यक्तीने त्यांना माझी परदेशातत काम करण्याची ईच्छा व्यक्त केली. आरोपीमी त्यांना परदेशात जाण्याचा व्हिजा काढुन देता असे सांगुन माझ्याकडे 50000 रुपयाची मागणी केली. त्यावर मआलफिन राफिल यांनी त्यांना माझे काम पुर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला पैसे देतो असे सांगितले.

नोव्हेंबर 2022 मध्ये सुनील कृष्णन याने आलफिन राफिल यांच्या नावाचे व्हिजा करीता ऑनलाईन फॉम व त्याकरीता आवश्यक असलेले सर्व कागदपत्र देखील ऑनलाईन पध्दतीने अपलोड केले असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीला 17 मार्च 2023 रोजी बायोमिटर्टीक असल्याचे सांगितले. त्याकरीता मुंबईच्याअमेरिकन कॉन्सलेट बीकेसी बांद्रा मुंबई याठिकाणी जावुन प्रक्रिया पूर्ण करून येण्यास आरोपींनी सांगीतले. त्याप्रमाणे पिडीत आलफिन राफिल यांनी आरोपी सुनिल कृष्णन याच्यावर विश्वास ठेवत त्याने सांगितल्याप्रमाणे दिनांक 17 मार्च 2023 रोजी मुंबईत येऊन बायोमेट्रिक केले.

crime case
Police Recruitment : मुंबई पोलीस भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेची तारीख ठरली

20 मार्च रोजी आलफिन राफिल याना मुलाखतीकरीता अमेरिकन कॉन्सलेट बीकेसी बांद्रा पूर्व येथे बोलवण्यात आले. आलफिन राफिल तिथे पोहोचले असता तेथील अधिकाऱ्यानी त्यांना त्यांनी सादर केलेले कागदपत्रामध्ये प्रमाणपत्र खोटे असल्याचे सांगितले. ते कागदपत्र आलफिन राफिल यांनी पाहिले असता ते कागदपत्र हे खोटे असल्याचे त्यांना समजुन आले. त्यावेळी अमेरिकन कॉन्सलेटचे अधिकारी यांना सदर कागदपत्रांबाबत आलफिन राफिल यांनी माहिती दिली.

व्हिजा काढण्याकरीता भरलेला फॉर्म व त्याकरीता आवश्यक असणारे कागदपत्र हे एजन्ट नामे सुनिल कृष्णन याने ऑनलाईन सबमिट केले असल्याचे आलफिन राफिल यांनी अधिकाऱ्यांना सांगितले, अखेर तेथील अधिकाऱ्यांना आणि आलफिन राफिल याना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर या प्रकरणी अमेरिकन कॉन्सलेट आणि पिडीत आलफिन राफिल यांच्या तक्रारीवर गुन्ह्याची नोंद केली आहे. बीकेसी पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com