Crime : माटुंगा बाल गृहात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

माटुंगा बालसुधारगृहात असणाऱ्या 10 वर्षीय मुलावर 14 वर्षीय सह कैद्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
Sexual-Assault
Sexual-Assaultsakal
Summary

माटुंगा बालसुधारगृहात असणाऱ्या 10 वर्षीय मुलावर 14 वर्षीय सह कैद्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई - माटुंगा बालसुधारगृहात असणाऱ्या 10 वर्षीय मुलावर 14 वर्षीय सह कैद्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. माटुंगा पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कलमांतर्गत केला गुन्हा दाखलप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलानेच अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर पिडीत मुलाला त्रास होऊ लागल्यानंतर त्याने केली बालसुधारगृहाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली आणि त्यातून घटना उघडकीस आली.

माटुंगा पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार सोमवारी 27 फेब्रुवारी रोजी 14 वर्षांच्या विशेष मुलाने 10 मुलावर लैंगिक अत्याचार केले . जेव्हा मुलाने त्याच्या गुप्तांगांमध्ये वेदना होत असल्याची तक्रार केली तेव्हा बालसुधार गृहातील अधिकाऱ्यांना सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात संशय आला नाही. वेदना थांबण्यासाठी पिडीत मुलाला बालसुधार गृहातील अधिकाऱ्यांनी औषधे दिली.

Sexual-Assault
Sandeep Deshpande Attack : हल्लेखोर मोक्का अंतर्गत कारवाई झालेला गुंड; गवळी गँगलाही नडला होता

परंतु तो सतत वेदना होत असल्याची तक्रार करत असल्याने त्याला अखेर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवल्यानंतर शुक्रवारी माटुंगा पोलीस ठाण्यात पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी 14 वर्षांच्या आरोपी मुलगा आधीच बालगृहात असल्यामुळे त्याला ताब्यात घेतले नाही . पोलीस या प्रकरणातील अधिक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com