Mumbai Crime : पुरलेल्या मृतदेहाचा हात जमिनीतून वर आला अन् खूनाचे रहस्य उलगडले

crime
crimeesakal

डोंबिवली : दुकानातील बिल वसुलीवरुन दुकान मालक आणि कामगार यांच्यात सतत खटके उडत असत. अखेर कामगाराने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने मालकाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दहागाव येथील जंगलात पुरला देखील मात्र पुरलेल्या मृतदेहाचा हात जमिनीतून बाहेर आला आणि हत्याकांडाला वाचा फुटली. टिटवाळा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप शिंगटे व त्यांच्या पथकाने याचा शिताफीने तपास करत तिघांना अटक केली आहे.

कल्याण तालुका ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सचिन म्हामाने यांचे टिटवाळा येथे दुकान आहे. त्यांच्या दुकानात सुनिल मोरे हा नोकरी करत होता. दुकानाच्या मालाच्या वसुलीचे काम सुनिल करत असते. बिल वसुलीबाबत सुनिल व सचिन यांच्यात सतत खटके उडत असत. तसेच आपल्या पत्नी सोबत कामगार सुनिल याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने देखील दोघांत सतत भांडणे होत असत. सततच्या वादामुळे सुनिल याने सचिन याचा काटा काढण्याचे ठरविले.

crime
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मित्र शुभम गुप्ता व अभिषेक मिश्रा यांना देखील त्याने आपल्या कटात सामील करुन घेतले. त्यांना योजनेची माहिती देत दुकानाचे मालक सचिन यांना कल्याण तालुक्यातील दहागाव येथील जंगलात गोड बोलून घेऊन गेले. त्यानंतर दोघांनी सचिनचे हात पाय धरून सुनीलने दुकान मालकाचा गळा आवळून त्यांचा खून केला. पती घरी येत नसल्याने त्यांच्या पत्नीने टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये सचिन हरविले असल्याची तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीनुसार टिटवाळा पोलिस सचिन यांचा शोध घेत होते.

दोन दिवसांपूर्वी जंगलात जमिनीत गाडण्यात आलेल्या मातीच्या ढीगाऱ्यातून मृतदेहाचे हात वर आल्याने याबाबत टिटवाळा पोलिसांना माहिती देण्यात आली. टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिश्रक जितेंद्र ठाकूर यांनी याबाबत तपास करण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे व त्यांच्या पथकाला दिले.

crime
Mumbai News : बड्डे आहे खड्ड्यांचा जल्लोष साऱ्या नागरिकांचा; मुंबईत खड्ड्यांचा वाढदिवस साजरा

याबाबत मृतदेह उकरून काढल्यानंतर मयताची गाडी एका किमी अंतरावर दिसून आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर सचिन याची हत्या झाल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी कुशलतेने तपास करीत माहिती घेतली असता दुकानात काम करीत असलेल्या सुनील मोरे व त्यांच्या दोन मित्रांनी ही हत्या केल्याचे चौकशीत समोर आले आहे. तसेच पत्नीच्या चारित्र्याबाबत नोकरावर संशय घेतल्याने या वादातून दुकान मालकाची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

जमिनीतून मृतदेहाचा हात वर आल्याने या हत्येचा उलगडा झाला असून खूनाला वाचा फुटली आहे. पोलिसांनी आठवड्या भरात या खूनाचा उलगडा केला असून तिन्ही आरोपींना अटक केली असून सखोल चौकशी सुरु केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com