गुप्तचर माहितीच्या आधारावर मुंबई पोलीसांचे नवे आदेश...

नोवहेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी आदेश ..
Mumbai crime New order of Mumbai Police based intelligence information
Mumbai crime New order of Mumbai Police based intelligence informationSakal
Updated on

मुंबई : मुंबईत घातपाताच्या सातत्याने मिळणाऱ्या धमक्याच्या पार्श्वमीवर मुंबई पोलिसांनी 1 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने नवीन आदेश जारी केले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून नवीन आदेश देण्यात आले आहे. 1 ते 15 नोव्हेंबर या काळात मुंबईत पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येणे, बेकायदेशीर मिरवणुका, लाऊड ​​स्पीकर, बॅण्डचा वापर यावर घालण्याचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. शांतता, कायदा व सुव्यवस्था बिघडवणे, मुंबईत घातपात संदर्भात गुप्तचर संस्थाकडून याविषयी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिस उपायुक्तनी हा आदेश जारी केला.

पोलीस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार जारी करण्यात आलेल्या आदेशात या काळात होणारे विवाहसोहळे, अंत्यविधी, क्लबमधील कार्यक्रम, कंपन्यामधील कार्यक्रम, सहकारी संस्था, चित्रपटगृहे आणि सिनेमा हॉलमधील सभांना सूट देण्यात आली आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या, सामाजिक सुरक्षा किंवा सरकारच्या विरोधात कट करणारी चित्रे, चिन्हे आणि फलकांची निर्मिती, प्रदर्शन आणि प्रकाशन यावरही बंदी घालण्यात आली आहे. या आदेशानुसार या काळात प्रक्षोभक उच्चार, गाणी आणि संगीताचा वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाण्याचे आदेशात म्हंटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com