
मुंबई: अंधेरी पूर्व येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ३० वर्षीय जितेंद्र चंद्रकांत तांबे उर्फ जितू याने १७ वर्षीय दीपाली (नाव बदलले आहे) हिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. दीपालीची आई त्याला भेटण्यास विरोध करत होती, त्याच्या रागातून त्याने हे भीषण कृत्य केले. या घटनेत दीपाली ६० टक्के भाजली असून ती सध्या कूपर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.