
त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वत:च्याच आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या पोलीस वृद्ध महिलेच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.