Mumbai Crime
esakal
मुंबई : दक्षिण मुंबईत घडलेल्या (Mumbai Crime News) एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केवळ २० वर्षीय गतीमंद तरुणीवर अनेकांनी लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं असून, ही भयावह बाब तेव्हा समोर आली, जेव्हा तिच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तपासणीत ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं.