
Mumbai News: प्रेमी युगलाकडून पैसे उकळल्याप्रकरणी मिरा भाईंदर-वसई विरार (MBVV) पोलिसांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रेमी युगल मिरा रोड येथे गप्पा मारत बसलं होतं. यावेळी त्याठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल सुर्यकांत केंद्रे आला होता. केंद्र मिरा रोड पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सेक्युरिटी फॉर्सचा गार्ड गोकुळ पुर्हे याने मिरा रोडवरील बेव्हरली पार्क भागात एल. आर. तिवारी इंजिनिअर कॉलेज येथे असलेल्या प्रेमी युगलांना पकडले होते. त्यानंतर पुर्हे याने केंद्रे याला याची माहिती दिली. केंद्र घटनास्थळी आला. यावेळी केंद्रेने जोडप्याला धमकावलं. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याचं म्हणत त्याने पैशाची मागणी केली.