Mumbai Crime News : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांचा फोर्टमधील हॉटेलमध्ये मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Crime News

Mumbai Crime News : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांचा फोर्टमधील हॉटेलमध्ये मृत्यू

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील सचिवांचा फोर्टमधल्या हॉटेलमध्ये मृत्यूची घटना बुधवारी घडली आहे. दक्षिण मुंबईच्या फोर्टमधील एका हॉटेलात जेवत असताना प्रशांत नवघरे यांचा आकस्मिक मृत्यू झाला.

प्रशांत नवघरे हे 57 वर्षांचे असून ते राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव म्हणून कार्यरत होते.या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून घेतली आहे.काळाघोडा परिसरातील तृष्णा हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवण करत असताना प्रशांत नवघरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं.

उपचारासाठी त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितल. बुधवारी संध्याकाळी प्रशांत नवघरे त्यांच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत