Mumbai : दारूसाठी पैसे दिले, बसायला खुर्ची ही दिली नाही; दारुड्याने सेक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला दगड

त्यांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
CRIME
CRIMEMumbai
Updated on

Mumbai - पाऊस आला म्हणून त्यांनी आडोसा म्हणून टेम्पो चा सहारा घेतला. तेवढ्यात तेथे एक दारुडा आला त्याने सेक्युरिटी गार्ड कडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले, तसेच बसायला खुर्ची दे असे देखील म्हणाला.

सेक्युरिटी गार्डने त्याला विरोध करताच त्याने वाद घालत सेक्युरिटी गार्डच्या रोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना डोंबिवली पश्चिम मध्ये घडली आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोर हर्षद कुशाळकर याला अटक केली आहे.

CRIME
Mumbai : मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह परदेशी नागरिकांना अटक

डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड परिसरात असलेल्या पटेल आर मार्टमध्ये मुन्नीराम सहानी हे सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास सहानी कर्तव्यावर असताना पाऊस आला म्हणून दुकानासमोर टेम्पो मध्ये बसले होते. यावेळी आरोपी हर्षद त्या ठिकाणी आला.

CRIME
Mumbai News : झोपू योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्यासाठी समिती

त्याने सहानी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यानंतर वॉचमनसाठी असलेली खुर्ची बसण्यास मागितली. मात्र सहानी यांनी खुर्ची देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या हर्षदने शिवीगाळ सहानी यांना शिवीगाळ केली. यावेळी त्याने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात बाजूला पडलेला दगड घातला त्यानंतर पुन्हा पेव्हर ब्लॉक घातला.

दरम्यान, या हल्ल्यात सहानी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करत विष्णूनगर पोलिसांणी हल्लेखोर हर्षद कुशाळकरला सिद्धार्थनगर येथून बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

crime
PMC to probe officials after court's chair-seizure order over land compensation delay.
Farmers Win After 21 Years Court Pulls Up Pune Municipal Corporation In Land Compensation Case
The Pune Municipal Corporation averted the seizure of the Municipal Commissioner's chair after assuring the court that ₹12 crore compensation due to farmers in a long-pending land acquisition case would be paid by August 11.
Marathi News Esakal
www.esakal.com