Mumbai Crime: संसार मोडल्याचा राग अनावर! आधी सासुला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, मग जावयानेही जीवन संपविले
Crime News: मागील ५ ते ६ महिन्यापासून कृष्णा याची पत्नी रुग्ण सांभाळण्यासाठी बोरिवली येथे गेली होती व त्याच ठिकाणी राहण्यास होती. कृष्णाचा एक मुलगा २२ वर्षाचा असून मुलगी २३ वर्षाची आहे. तिचा विवाह झाला आहे.
Man burns mother-in-law alive with petrol, then ends his own life. esakal
मुंबईतील मुलुंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयाने सासुला टेम्पोत कोंबून जिवंत पेटवून दिले आणि नंतर त्यानेही आपले जीवन संपविले. सासूने आपला संसार मोडला याचा राग जावयाला होता, त्यामुळे त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे.