esakal | Mumbai: कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस

कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : सकाळपासून कडक ऊन असले तरी रात्री 6.30 च्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. जोरदार पावसास सुरवात झाल्याने नवरात्रोत्सव निमित्त घटाचे समान खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

कल्याण, डोंबिवली परिसरात सायंकाळी 6.30 च्या सुमारास ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. नवरात्रीनिमित्त बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली आहे. पावसाने मात्र भक्तांच्या आणि विक्रेत्यांच्या उत्सवावर पाणी फिरवले. अचानक आलेल्या पावसामुळे सामानाची हलवाहलव करताना आणि आडोसा शोधताना एकच धावपळ उडाल्याचे दिसले.

हेही वाचा: पुणे : मुसळधार पावसाने वारजे झाले चक्काजाम

मुसळधार पावसामुळे डोंबिवली स्टेशन परिसरात पाणी साचले. हे पाणी आजूबाजूच्या दुकानातही गेल्याने दुकान दारांचे काहीसे नुकसान झाले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावे लागत होते. स्टेशन परिसर तसेच फडके रोड, आगरकर रोड परिसरातही रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह जोरात वाहत होता.

हवामान विभागाने चार दिवस पावसाची शक्यता वर्तविली असून कालपासून सायंकाळी 6 च्या दरम्यान पाऊस पडत असून किमान तास दीड तास कोसळणारा हा पाऊस चांगलीच दाणादान करीत आहे.

loading image
go to top