मुंबई : सराईत गुन्हेगाराने केली महिलेची हत्या; १२ दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात | Mumbai Crime Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

मुंबई : सराईत गुन्हेगाराने केली महिलेची हत्या; १२ दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घाटकोपरच्या (Ghatkopar) पंतनगर भागात काही दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा मृतदेह (woman deadbody) सापडला होता, त्यानॉतर युनिट 5 नं केलेल्या तपासात 12 दिवसांनी आरोपीला अटक (culprit arrested) केली. तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा आधीच एका गुन्ह्याच्या आरोपात ऑक्टोबरपर्यंत शिक्षा भोगत होता. सागर यादव (Culprit sagar yadav) असं आरोपीचं नाव आहे.

हेही वाचा: कोविड महामारीचा मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम; वाचा सविस्तर

मृत्यू झालेल्या महिलेला तो आधीपासून ओळखत होता, आरोपीनं महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तिनं विरोध केल्यानंतर त्यानं तिचा खून केला आणि मृतदेह विवस्र करुन फेकून तो फरार झाला होता. त्यानंतर सीसीटीव्ही आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर मानखुर्द रेल्वे स्टेशनवर सापळा रचुन पोलिसांनी त्याला पकडलं. आरोपी हा नवी मुंबईचा राहणारा आहे. त्याचं मानसिक आरोग्य ठिक नसल्याचंही पोलिस तपासात समोर आलंय.

loading image
go to top