मुंबईत विक्रीसाठी आणण्यात येणारी एक कोटीची अवैध दारु जप्त | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Excise department

मुंबईत विक्रीसाठी आणण्यात येणारी एक कोटीची अवैध दारु जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गोव्यात जाणारे अनेक पर्यटक येताना गोव्यात तयार होणारी विदेशी दारु (Goa liquor) महाराष्ट्रात कर चुकवून (tax) घेऊन येतात. असंच एक मोठं कन्साईनमेंट गोव्याहून मुंबईत विक्रीसाठी आणण्यात येत होतं. गोव्याहून मुंबईत येणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकमधून राज्य उत्पादन शुल्काच्या (Maharashtra excise department) भरारी पथकानं गोव्यात बनणारी पण महाराष्ट्रात विक्री करायला बंदी असणाऱ्या विदेशी दारुचा मोठा साठा जप्त (liquor stock seized) केलाय, त्याची किंमत एक कोटी आठ लाख रुपये आहे.

हेही वाचा: NCB विरोधात काय म्हणालं हायकोर्ट? आर्यनच्या जामीन आदेशातील दहा प्रमुख मुद्दे

मुंबई गोवा हायवेवर गोव्यातून कर चुकवून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेली विदेशी दारु आणली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. ही दारु मोठ्या ट्रकमधून आणली जात असल्याची माहिती होती, त्यानुसार राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकानं सायन पनवेल मार्गावरच्या रोडपाली फाट्यावरच्या उड्डाणपुलाखाली पाळत ठेवून सापळा लावला, मिळालेल्या माहीतीनुसार सांगण्यात आलेला ट्रक पहाटे रोडपाली फाट्यावर आला. त्यानंतर त्याला अडवण्यात आलं, ट्रकमधुन १२९५ बॅक्स जप्त करण्यात आले, बॅक्सेसमध्ये दारु आहे हे समजून येई नये यासाठी बॉक्सवर काजुच्या सालींच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या.

या प्रकरणात गाडीचा ड्रायव्हर योगेश मीना वय ३८, आणि क्लिनर राहुल भिलाला, वय २० यांना अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून रॉयल ब्लू व्हिस्की १८० मिलीच्या १२९० बाटल्यांनी भरलेले ४८ बॉक्स, २ मोबाईल फोन, दारु लपवण्यासाठी वापरण्यात आलेल्या काजूच्या सालींच्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (ए) (ई), ८१, ८३ आणि ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा ट्रक कॉमाचा होता, दारु कुणाकडे जाणार होतीं कुणी पाठवली होती, या सगळ्याचा तपास करण्यात येत आहे.

loading image
go to top