घराचं आमिष दाखवून मुंबईतल्या १६ जणांना कोट्यवधींचा गंडा; पती-पत्नीवर गुन्हा | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police fir

घराचं आमिष दाखवून मुंबईतल्या १६ जणांना कोट्यवधींचा गंडा; पती-पत्नीवर गुन्हा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतल्या हिरानंदानी (hiranandani) सारख्या पॉश ठिकाणी घर घेऊन देतो, असं सांगून जवळपास 16 जणांकडून 2 कोटीपेक्षा जास्त पैसे लुबाडणाऱ्या (money fraud) नवरा- बायकोवर (couple) माहीम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात (FIR) आलाय.

हेही वाचा: कोविड लसीच्या नावावर ज्येष्ठ नागरिकाला १३ लाखांचा गंडा; दोघांना अटक

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न इथं राहणारा प्रत्येकजण बघत असतो, त्यातही चांगल्या विभागात कमी किमतीत घर मिळालं तर कुणाला नको असत ? अशीच घराची स्वप्न पाहणाऱ्या नागरीकांना हेरुन त्यांना लुबाडण्यात येत होतं. सोनिया पवार या अशाच कमी किमतीत चांगल्या एरीयात घर मिळण्याच्या अमिषाला बळी पडल्या. त्यांना मुंबईत घर घ्यायचं होतं, यासाठी 2019 मध्ये त्यांच्याच नातेवाईकानं सुचवलेल्या एका इस्टेट एजंसीकडे त्या गेल्या, ही इस्टेट एजन्सी सुरेश पवार आणि त्यांची पत्नी शैला पवार यांची असल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

सुरेश पवार मुंबईतल्या अनेक चांगल्या ठिकाणची घरं कमी किमतीत मिळवून देतात असं सोनिया यंना त्यांच्या नातोवाईकानं सांगितलं. सोनिया पवार यांनी सांगितल्याप्रमाणे सुरेश पवार हे त्यांना पवई हिरानंदानी मध्ये हिल ग्रेन्झ नावाच्या इमारतीत आणि कांजुरमार्गच्या मॅरेथॉन पी 1 नावाच्या इमारतीत घरे दाखवली. त्यानंतर काही दिवसांनी सोनिया यांनी त्या पवई हिरानंदानी इथला हिल ग्रेन्झ इमारतीतला फ्लॅट घेण्यास इच्छुक असल्याचं सुरेश पवार यांना कळवलं. सदर फ्लॅटची हा 50 लाखात तुम्हाला मिळेल असे सांगितले. त्या फ्लॅटची खरी किंमत जवळपास 1 कोटी 20 लाख आहे. सुरेश पवार यांनी 50 टक्के रक्कम बुकींगच्या वेळी आणि 50 टक्के रक्कम फ्लॅट ताब्यात मिळताना द्यावी लागेल असं सांगितलं.

त्यानुसार सोनिया पवार यांनी त्यांना दोन महिन्यात पात लाख रोख रक्कम दिली. दरम्यान सोनिया यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीही त्या इमारतीत फ्लॅट घ्यायचा होता, त्यालाही त्यांनी सुरेश पवार याला भेटवून दिलं, 2019 मध्ये सोनिया पवार यांना त्यां फ्लॅटचे रजिस्टर कागदपत्रही मिळाले, पण ते खोटं असल्याचं नंतर त्यांच्या लक्षात आलं. तोपर्यंत सुरेश पवार यांनी जवळपास 16 जणांना लुबाडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सुरेश पवार यांच्याकडे सतत पैशांची मागणी करुनही त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली. सुरेश पवार यानं अनेकांना घराचं बनावट ताबापत्रही दिलं होतं. तर काहींना फ्लॅटच्या चाव्याही दिल्या होत्या. या तक्रारीनंतर पोलीस आरोपींंचा शोध घेत आहेत.

loading image
go to top