मुंबई : घरातच भारतीय चलनाच्या खोट्या नोटा छापणाऱ्याला अटक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fake notes

मुंबई : घरातच भारतीय चलनाच्या खोट्या नोटा छापणाऱ्याला अटक

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) पायधुनी भागात घरातच भारतीय चलनाच्या खोट्या नोटा (Indian currency fake note) बनवून वापरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक (culprit arrested) केलीय. मुंबई पोलिसंच्या (Mumbai Police) गुप्तवर्ता विभागाला त्यांच्या खबऱ्याकडून पायधुनी भागात एक व्यक्ती घरातच खोट्या नोटा बनवून बाजारात वापरतो अशी माहीती मिळाली होती, त्यानुसार मुंबईच्या गुप्तवार्ता विभागानं छापा टाकला, तेव्हा पोलिसही आश्चर्यचकीत झाले.

हेही वाचा: अट्टल हल्लेखोरास अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

47 वर्षांच्या शब्बीर हासिम कुरेशीच्या घरात प्रिंट केलेल्या 1 लाख 60 हजाराच्या नोटा सापडल्या, त्यानंतर घराची झडती घेतली तेव्हा शब्बीर हा कम्प्युटर प्रिंटरवर गेले अनेक दिवस खोट्या नोटा छापत होता. पायधुनीच्या करीमी मंजील नारायण ध्रूत स्ट्रीटवर आरोपीचं घर आहे जीथं खोट्या नोटा छापल्या जात होत्या. ह्या छापलेल्या नोटा आरोपी बाजारात वापरत होता. पोलिसांनी खोट्या नोटा छापण्याचं सामान जप्त केलं आहे. आणि शब्बीरला अटक केलीय. त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.

आरोपीची चौकशी करताना आरोपीवर याआधीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीय. एनडीपीएस कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात त्याला अटकही करण्यात आली होती. आरोपीवर भा द वि च्या कलम 489(अ), 489(ब), 489(क),489(ड) आणि 120(ब) अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

loading image
go to top