...म्हणून केला प्राणघातक हल्ला; मुंबईच्या विलेपार्लेत एकावर चाकुने वार | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

knife attack

...म्हणून केला प्राणघातक हल्ला; मुंबईच्या विलेपार्लेत एकावर चाकुने वार

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं म्हटलं जातं, रागाच्या भरात केलेली कृत्ये ही माणसाचं आयुष्य बदलून टाकतात, याचंच उदाहरण मुंबईतल्या विलेपार्ले (vileparle) भागात दिसलं. रस्त्यावरुन जात असताना एका व्यक्तीनं बाईक पुढे घेऊन जायला रस्ता दे असं सांगितलं, या किरकोळ गोष्टीचा राग आल्यानं चाकुचे वार करुन प्राणघातक हल्ला (knife attack) केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या विलेपार्लेत घडली. आरोपीला पोलिसांनी अटक (culprit arrested) केलीय.

हेही वाचा: ...त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम होतेय - पवार

रोशन राजेश शिंदे वय 21, हे विलेपार्लेच्या सहार कार्गो रोडवरुन त्यांच्या मोटरसाकलवर जात होते, समोरुन आरोपी हा त्याच्या मोटरसायकलवरुन येत होता, दोघंही समोरासमोर आल्यावर रोशन शिंदे यांनी आरोपीला मोटरसायकल बाजूला घ्यायला सांगितली. त्याचा आरोपीला राग आला, त्यानं त्याच्या गाडीच्या डिक्कीत असलेल्या धारदार चाकुनं रोशन यांच्या पोटाच्या मधोमध, छातीवर, दोन्ही खांद्यावर सपासप वार केले.

जखमी रोशनला त्यांच्या मित्रानं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर भा.द.वी च्या कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

loading image
go to top