मुंबई : चाकुचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्याला अटक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprits arrested

मुंबई : चाकुचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्याला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिवसा ढवळ्या आणि रात्रीही चाकुच्या धाकानं (Knife attack threat) नागरिकांना लुटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक (culprit arrested) केलीय. रमाकांत भोसले, उर्फ नितीन उर्फ ताटल्या असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मुंबईतल्या वरळी आणि अजूबाजूच्या परिसरात नागरिकांना रमाकांत भोसलेचा चांगलाच धसका घेतसा होता. कारण तो कधीही, कुठेही आणि कुणालाही चाकुचा धाक दाखवून लुटत होता. अनेक नागरिकांनी त्याच्या विरोधात तक्रारी दाखल (Police complaints) केल्या होत्या, आता त्याला अटक झाल्यानंतर तिथल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हेही वाचा: मुंबईत ४.७५ लाख लाभार्थ्यांनी चुकवला दुसरा डोस; वाचा सविस्तर माहिती

24 नोव्हेंबरला दुपारी वरळीच्या जांबोरी मैदानाच्या बाहेर बाईकवरुन जात असताना एका 50 वर्षीय व्यक्तीला चाकुचा धाक दाखवून त्यांच्या खिशातले 600 रुपये, पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन पळाला. त्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला.

पोलीस पकडायला गेल्यावर त्यांनी पोलिसांवरही चाकूने हल्ला करत त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. पण शेवटी तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला. नितीन भोसलेला दारु पिण्याची सवय होती, दारुसाठी पैसे मिळवायला तो लोकांना अशा पद्धतीनं लुटत होता.

loading image
go to top