मुंबई : माहीम पोलिसांनी जप्त केलं लाखो रुपयांचं एमडी ड्रग; दोन जणांना अटक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested

मुंबई : माहीम पोलिसांनी जप्त केलं लाखो रुपयांचं एमडी ड्रग; दोन जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माहीम पोलीस (Mumbai police) आणि मुंबईच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकानं माहीममधून (mahim) 13 ग्रॅम एमडी ड्रग (md drug seized) जप्त केलंय. ड्रग बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटकही (culprit arrested) करण्यात आलीय.

हेही वाचा: NCB विरोधात काय म्हणालं हायकोर्ट? आर्यनच्या जामीन आदेशातील दहा प्रमुख मुद्दे

माहीम पोलिस आणि मुंबई गुन्हे प्रकटीकरणाचं रात्रपाळीचं पथक सकाळी 7.30 वाजता गस्त घालत असताना माहीममधल्या कनाकिया मियामी बिल्डींग जवळ एका इनोव्हा कारजवळ (TS 09 UB 8824) 4 व्यक्ती संशयीतरित्या उभ्या होत्या. पोलिसांना बघून त्यांनी पळायला सुरुवात केली, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यातल्या दोघांना ताब्यात घेतलं. दोघंजण पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या दोघांकडून एकुण 13 ग्रॅम वजनाचं एमडी ड्रग पोलिसांना मिळालं.

त्याची किंमत आंततराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावं मोहम्मद आरीफ महोम्मद शेख, वय 39 आणि आतिक हमीद शेख उर्फ इटली अशी आहेत, दोघंही मुंबईचे रहिवासी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आरोपींसोबत असलेल्या इनोव्हा कारमध्ये 4 लाख रुपयांची रोख रक्कमही पोलिसांना मिळलीय.

दोन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी हे ड्रग अजमल कासीम शेख आणि समीर शब्बीर शेख उर्फ पाणीपुरी यांच्याकडून घेतल्याचं सांगितलं. दोघंही फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर NDPS अॅक्ट च्या कलम 8(क) आणि 22(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई परिमंडळ 5 च्या पोलिस आयुक्त राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

loading image
go to top