esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

मानखुर्दमध्ये हत्येप्रकरणी एकाला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मानखुर्द : गोवंडीच्या (Govandi) बैंगणवाडी परिसरातील कमला रामनगरमध्ये मंगळवारी (ता.५) रात्री किरकोळ वादातून हलीम ऊर्फ पप्पू ऊर्फ सुली इरशाद खान (वय ३३) याची हत्या (murder) करण्यात आली. त्याच्या हत्येप्रकरणी सलीम खान (वय ४०) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे (shivaji nagar police) तक्रार केली. हत्येच्या गुन्ह्यासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून गुलजार अन्सारी (वय २९) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक (culprit arrested) केली आहे.

हेही वाचा: राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचे नोकरीत कायमत्वासाठी आझाद मैदानात धरणे

मागील आठवड्यात (ता. २) गुलजारचा भाऊ अकबर ऊर्फ बादशहा याच्या दुकानातून हलीमने विकत घेतलेल्या शीतपेयाचे पैसे देण्यावरून वाद झाला होता. या वादात झालेल्या हाणामारीत हलीमला दुखापत झाली होती. त्या वेळी दोघांच्या नातेवाईकांनी सामंजस्याने वाद मिटवून हलीमच्या उपचाराचा खर्च देण्याचे अकबरच्या नातेवाईकांनी कबूल केले होते.

त्यामुळे पोलिसांत तक्रार झाली नव्हती. मंगळवारी (ता.५) रात्री पावणे बाराच्या सुमारास हलीमने गुलजारच्या दुकानात जाऊन त्या वैद्यकीय खर्चाची मागणी केली. त्यावेळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. या वादात गुलजार व त्याचा भाऊ लियाकत याने हलीमला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीवेळी गुलजारने चाकूने हलीमला पोटात भोसकले. तसेच हातावर व डोक्यावर गंभीर वार केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

loading image
go to top