esakal | सहा वर्षांच्या मुलीवर कांदिवलीत अत्याचार; डिलिव्हरी बॉयला अटक | Kandivali crime
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सहा वर्षांच्या मुलीवर कांदिवलीत अत्याचार; डिलिव्हरी बॉयला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : सहा वर्षांच्या मुलीवर (minor) लैंगिक अत्याचार (Sexual assault) करण्यात आल्याची धक्कादायक घटना कांदिवलीतील (kandivali) चारकोप परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या कलमांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या १९ वर्षांच्या डिलिव्हरी बॉयला चारकोप पोलिसांनी बुधवारी (ता. ६) अटक (Culprit arrested) केली. त्याला दिंडोशीतील विशेष सत्र न्यायालयाने शनिवार (ता. ९) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण; सिनेटमध्ये गदारोळ

चारकोप परिसरातील एका हॉटेलात आरोपी डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊ वाजता तो पार्सल डिलिव्हरीसाठी आला असताना त्याने मुलीला पत्ता विचारला. मुलीने पत्ता सांगताच तो तिला इमारतीच्या आत घेऊन गेला आणि तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो पळून गेला.

मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यावर त्यांनी रात्री उशिरा चारकोप पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोस्कोच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पळून गेलेल्या डिलिव्हरी बॉयला चारकोपमधून अटक केली. सत्र न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top