esakal | मुंबई : अभियंत्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अटक | Mumbai crime update
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested

मुंबई : अभियंत्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : मिरा रोड-भाईंदर महापालिकेचे (Mira-bhayandar municipal) कार्यकारी अभियंता दीपक खांबिट (deepak khambit) यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी (firing case) अजय चंद्रशेखर सिंग या मुख्य शूटरला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक (culprit arrested) केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात (borivali court) हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: मुंबई : पेंग्विन, वाघोबाचे दर्शन कधी होणार? राणीची बाग अजूनही बंद

या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी श्रीकृष्ण महिते, यशवंत देशमुख, अमित सिन्हा, प्रदीपकुमार पाठक आणि राजू विश्‍वकर्मा या आरोपींना अटक केली आहे. ते सर्वजण सध्या पोलिस कोठडीत आहेत. २९ सप्टेंबरला बोरिवली येथे दीपक खांबिट यांच्यावर दुचाकीवरून येत आरोपी अमित व अजय यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात ते थोडक्यात बचावले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. आरोपींपैकी श्रीकृष्ण मोहिते आणि यशवंत देशमुख हे मिरा-भाईंदर मनपाचे कनिष्ठ अभियंता आहेत. त्यांनीच दीपक खांबिट यांच्यावर गोळीबार करण्याची सुपारी दिली होती. तपासात ही बाब उघडकीस येताच तीन दिवसांपूर्वी दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

loading image
go to top