esakal | मुंबई : पेंग्विन, वाघोबाचे दर्शन कधी होणार? राणीची बाग अजूनही बंद | Ranichi bagh
sakal

बोलून बातमी शोधा

tiger

मुंबई : पेंग्विन, वाघोबाचे दर्शन कधी होणार? राणीची बाग अजूनही बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) धोका तूर्तास नाही, असे महापालिका (BMC) प्रशासनातर्फे सांगण्यात येते. मॉल, मैदान, उद्यान, मंदिर सर्वच खुले करण्यात आले आहे. मग राणीची बाग (Ranichi Bagh) कधी उघडणार, असा प्रश्‍न बच्चेकंपनीला (children) पडला आहे. अद्याप राज्य सरकारकडून (mva government) कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत; मात्र आम्ही तयारी सुरू केली आहे, असे प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून (Zoo authorities) सांगण्यात आले.

हेही वाचा: Mumbai : ‘एनसीबी’ने त्या तिघांना का सोडले?

राणीच्या बागेत नव्या पेंग्विनचा जन्म झाला आहे; तर कोविडच्या पहिल्या लाटेपूर्वी औरंगाबादमधून वाघाची जोडीही दाखल झाली आहे. मात्र, कोविडच्या दीड वर्षाच्या काळात भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय मोजके दिवस खुले होते. दुसरी लाट आल्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे प्राणिसंग्रहालय पुन्हा बंद करण्यात आले. ते अजूनही खुले झालेले नाही.

पेंग्विनच्या जन्माची बातमी घराघरांत पोहचल्यानंतर बच्चे कंपनीची चलबिचल सुरू झाली आहे. ते पालकांकडे रोज राणीच्या बागेत येण्याचा हट्ट कररत आहे. इंटरनेटवर राणीची बाग खुली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काही पालक मुलांना बागेजवळ घेऊनही येत आहेत. नंतर मात्र त्यांची निराशा होत आहे.

नियमांकडे लक्ष

गेल्या फेब्रुवारीमध्ये राणीची बाग काही दिवस खुली करण्यात आली होती. कोविडचे रुग्ण वाढू लागल्यानंतर ती पुन्हा बंद करण्यात आली. आता राणीची बाग खुली केल्यावर कोविडचे सर्व नियम पाळले जातील, याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

loading image
go to top