esakal | पोलीस महिलेने घडवली सहकाऱ्याची हत्या ; तीन आरोपींना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

पोलीस महिलेने घडवली सहकाऱ्याची हत्या ; तीन आरोपींना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : मुंबईतील नेहरूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शीतल प्रकाश पानसरे (Sheetal pansare) या महिला पोलीसाने त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक शिवाजी सानप (Police shivaji sanap) (वय ४९) यांची सुपारी देऊन हत्या (murder) घडवून आणल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात महिलेसह अन्य दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

हेही वाचा: व्हेल माशांच्या उलटीच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक

आरोपींनी मागील वर्षभरापासून कट रचून नॅनो कारची धडक देऊन ही हत्या करून सानप यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी शीतल पानसरे (वय २९), विशाल बबनराव जाधव (वय १८) व गणेश लक्ष्मण चव्हाण ऊर्फ मुदावथ (वय२१) या तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली.

शिवाजी सानप १५ ऑगस्ट रोजी पनवेल येथे कारची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. सानप यांची पत्नी व मेव्हणा यांनी अपघाती मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. त्यावरून पोलिसांनी कौशल्याने तपास करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला. गणेश लक्ष्मण चव्हाण ऊर्फ मुदावथ याला तेलंगणा येथून ताब्यात घेतले, तर शीतल व विशाल या दोघांना उलवे येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी सांगितले.

अनैतिक संबंधांतून कट

शिवाजी सानप व शीतल पानसरे त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. काही कारणामुळे त्यांच्यात वाद होऊन त्यांचे संबंध तुटले. त्यातून शीतल हिने घरकाम करणारा विशाल जाधव व त्याचा मित्र गणेश चव्हाण यांना सोबत घेऊन सानप यांना ठार मारण्याचा कट रचून तडीस नेला. शीतलने सानपवर विनयभंगाचा व बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणाचा कौशल्यपूर्वक तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याने पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी पनवेल शहर पोलिसांची कौतुक करून त्यांना बक्षिस देणार असल्याचे जाहीर केले आहे.

loading image
go to top