मुंबई : कुविख्यात गुन्हेगार अमित भोगलेला गुन्हे शाखेकडून अटक

Mumbai crime
Mumbai crimesakal media
Updated on

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ऑक्टोबरला भांडूपमध्ये चार जणांनी मिळून सुरज मेहरा उर्फ सुरज नेपाळी (Suraj Nepali) याचा रस्त्यात अडवून चॉपर आणि तलवारीच्या सहाय्यानं पोटात आणि डोक्यावर वार करुन खून केला (Murder) होता. भांडूप पोलीस स्टेशनमध्ये (Bhandup police station) यासंबंधी गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Mumbai crime branch) युनिट 7 नेही या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. पोलिसांच्या तपासात हा खून कुविख्यात गुन्हेगार अमित भोगले (criminal Amit bhogale) यानं घडवून आणल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या युनिट 7 नं अटक केली.

crime update
crime updatesakal media

सुरज नेपाळी हाही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता, त्यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ऑक्टोबरमध्ये एका गुन्ह्याच्या सुनावणीसाठी सुरज नेपाळी हा न्यायालयात गेला असताना तिथं अमित भोगले आणि त्याच्यात वाद झाले होते, त्यातुनच अमित भोगलेनं सुरज नेपाळीच्या खूनाचा कट रचला होता. 4 ऑक्टोबर 2021 ला रात्री सुरज नेपाळी त्याच्या मित्रासोबत असताना त्या दोघांवरही जिवघेणा हल्ला करण्यात आला. त्यात सुरज नेपाळीचा मृत्यू झाला, तर त्याच्या मित्राला गंभीर दुखापत झाली होती.

खून झाल्यानंतर काही दिवसांत भांडूप पोलिसांनी काही हल्लेखोरांना आणि संशयितांना अटक केली होती. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे सुरज नेपाळीचा खून करण्याचा काही उद्देश नव्हता, त्यानंतर अमित भोगलेवर गुन्हे शाखेचा संशय गेला, आणि तपासाअंती गुन्हे शाखेनं त्याला अटक केली. आरोपींकडून दोन स्टेनलेस स्टील ब्लेड, एक जुनी वापरती तलवार, दोन देशी बनावटीचे पिस्टल, 8 जिवंत काडतुस, सफेद रंगाची ग्लोस्टर गाडी, दोन मोबईल असा अंदाजे 43 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींवर भा द विच्या कलम 302, 326, 342, 506, 120(ब) 143, 144, 148, 149, 34 तसंच भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com