मुंबईत 20000 हून अधिक प्रवाशांवर बिना सीट बेल्ट प्रवासामुळे कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

seat belt

मुंबईत वाहन चालवताना सीट पेट सक्ती केल्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात 43000 हून अधिक प्रवाशांवर प्रवासादरम्यान सीट बेल्ट न वापरल्यामुळे कारवाई केली.

Mumbai Passenger Crime : मुंबईत 20000 हून अधिक प्रवाशांवर बिना सीट बेल्ट प्रवासामुळे कारवाई

मुंबई - मुंबईत वाहन चालवताना सीट पेट सक्ती केल्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात 43000 हून अधिक प्रवाशांवर प्रवासादरम्यान सीट बेल्ट न वापरल्यामुळे कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात 14 ऑक्टोबर रोजी वाहन चालवताना चालक तसेच सहप्रवाशाना सीट बेल्ट वापरणे सक्तीचे आदेश जारी केले होते. 1 नोव्हेंबर पासून यावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली .सुरुवातीला काही दिवस 11 नोव्हेंबर पर्यंत वाहतूक पोलिसांची कारवाई ही धीम्या पद्धतीने होत होती. परंतु पुरेसा वेळ दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करायला 11 नोव्हेंबर नंतर सुरुवात केली.

43000 वर कारवाई

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत सीट बेल्ट न लावणाऱ्या 22,970 वाहनचालकांविरुद्ध आणि 20,719 सह प्रवाशांवर चलांन जारी करण्यात आले आहे. एकट्या मुंबईत सीट बेल्ट न घातल्याबद्दल चालकांसह सुमारे 43,000 नागरिकांना या महिन्यात चालना देण्यात आली आहे. या पूर्वी वाहतूक पोलिसांनी कारवाई पूर्वी मुंबईकरांना वाहतूक पोलिसांनी दिला होता.

पूर्व उपनगरात सर्वाधिक चलान

वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत सर्वाधिक चलान वाहतूक पोलिसांच्या पूर्व उपनगर क्षेत्रात 10,500 पेक्षा जास्त नोंदवण्यात आली. तर मुंबईत सर्वात कमी चलान वाहतूक पोलिसांच्या पश्चिम उपनगरात क्षेत्रात 6,287 संखेने प्रवाश्यांच्या विरोधात जारी करण्यात आले. वाहनचालक आणि प्रवाशांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी वाहतूक पोलिस नियमांची अंमलबजावणी करत आहेत. सीट बेल्ट न लावल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे.

पहिल्या दिवशी 185 जणांवर कारवाई

मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी कारवाईच्या पहिल्या दिवशी शहरातील किमान 185 कार प्रवाशांकडून मागील सीट बेल्ट न घातल्याबद्दल प्रत्येकी 200 रुपये दंड वसूल केला. 1 नोव्हेंबरपासून प्रवासा दरम्यान चारचाकित सीटवर सीट बेल्ट घालणे बंधनकारक होते. परंतु पुरेसा वेळ मिळावा आणि वाहनचालकांना सीट बेल्ट वापरण्यासाठी प्रबोधन करण्यात यावे यासाठी सुरुवातीला कारवाई धीम्या गतीने सुरू ठेवली.

पोलीसांचे आदेश

मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी 14 ऑक्टोबर रोजी मोटर वाहनचालकासाठी नवीन आदेश जाहीर केले होते. मुंबईत 1 नोव्हेंबरपासून चारचाकी मोटार वाहन चालक तसेच प्रवास करणाऱ्या वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. मोटार वाहन कायद्यामधील सुधारणा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईकरांकडून या आदेशासंदर्भात समिश्र प्रतिसाद मिळत आहे.