
Latest Mumbai Crime News: गुरुवारी मध्यरात्री सिने अभिनेता सैफ अली खान ज्याच्यावर धारदार शस्त्राने तब्बल सहा वार करून हल्ला करण्यात आला. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. डॉक्टर डांगे यांनी केलेल्या यशस्वी शास्त्र केल्यानंतर सैफ अली खान बरा झाला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मुंबईत सतत होणारे हल्ले यामुळे मुंबई खरंच सेफ आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडला आहे.
तसं पाहायला गेलो तर, मुंबईच्या वांद्रे पश्चिम भागामध्ये अनेक सेलिब्रिटी राहतात. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर उद्योगपती ही या भागात वास्तव्यास आहेत. अशावेळी या ठिकाणची सुरक्षा ही राज्याच्या आणि मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा सेलिब्रिटी एरिया म्हणजेच सेलिब्रिटी परिसर म्हणून ओळखला जाणारा वांद्रेचा भाग असुरक्षित झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि याला नक्की जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.