
Mumbai Crime: भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या तळघरात मंगळवारी (ता. २१) सकाळी साडेनऊच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. ही महिला अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असून उत्तरीय तपासासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.