esakal | मुंबईत 'या' वेळेला जमावबंदी लागू होणार, महापालिकेची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

मुंबईत 'या' वेळेला जमावबंदी लागू होणार, महापालिकेची माहिती

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : मुंबईचे व्यवहार (Mumbai) रात्री 10 वाजे पर्यंत सुरु राहाणार असले तरी रात्री 11 वाजे पर्यंत जमावबंदी (curfew) आणि रात्री 11 ते 5 वाजे पर्यंत संचारबंदी लागू राहाणार आहे. तसे परीपत्रक आज महानगर पालिका (bmc declaration) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbalsing chahal) यांनी प्रसिध्द केले. (Mumbai-curfew-bmc declaration-Iqbalsing chahal-nss91)

मुंबईत आज पासून दुकाने आणि आस्थापने रात्री 10 वाजे पर्यंत आठवड्याचे सातही दिवस सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.तर,उपहारगृह हॉटेल्स संध्याकाळी रात्री 4 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.मात्र,कोविडचे सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असून गर्दी न होण्याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: शिवसेनेच्या दणक्यानंतर विमानतळावर बोर्ड बदलण्याचे काम सुरू

यासाठी दिवसा रात्री 11 वाजे पर्यंत मुंबईत जमावबंदी लागू राहाणार आहे.तर,रात्री पासून पहाटे 5 वाजे पर्यंत संचार बंदी लागू राहाणार आहे. यापुर्वी दुकाने 4 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिल्यानंतर सायंकाळी 5 वाजल्यापासूनच संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता दुकानांची वेळ रात्री 10 पर्यंत वाढवल्यामुळे रात्री 11 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मॉल्स बंदच राहाणार

मुंबईत सर्व दुकाने आस्थापने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.त्यामुळे मॉल सुरु करावे का बंद करावे असा संभ्रम होता.मात्र,पालिकेने आज माॅल्स बंद राहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

loading image
go to top