मुंबई - मायलेकींच्या बॅगेत २५ कोटींचे हेरॉइन; उपचारासाठी आलेल्या भारतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drugs

कतार एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या मायलेकी जोहान्सबर्गहून मुंबईत आल्या होत्या. दोघीही भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचारासाठी आल्या होत्या.

मुंबई - मायलेकींच्या बॅगेत २५ कोटींचे हेरॉइन; उपचारासाठी आलेल्या भारतात

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत ४.९५ किलो हेरॉइन जप्त केलं आहे. या हेरॉइनची किंमत २५ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. जोहान्सबर्गहून आलेल्या मायलेकींकडून हे हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. सध्या गुजरातमधील मुंद्रा बंदरात जप्त करण्यात आलेल्या तीन हजार किलो हेरॉइनची चर्चा असतानाच मुंबईत विमानतळावर करण्यात आलेल्या कारवाईने अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

कतार एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या मायलेकी जोहान्सबर्गहून मुंबईत आल्या होत्या. दोघीही भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचारासाठी आल्या होत्या असं सांगण्यात येत आहे. ट्रॉली बॅगमध्ये हेरॉइन लपवण्यात आलं होतं. विमान प्रवाशांकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडत नाही अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: 'गुजरातमध्ये २१ हजार कोटींचं हेरॉइन सापडल्यावर गप्प का?'

कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात हेरॉइन आणण्यासाठी संबंधित महिलांना प्रत्येक खेपेसाठी ५ हजार डॉलर देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. दोघींना कोर्टात हजर करण्यात आलं असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

loading image
go to top