मुंबईचा डबेवाला BMC निवडणुकीच्या रिंगणात; अपक्ष निवडणूक लढवणार

Mangesh pangare
Mangesh pangaresakal media

मुंबई : विविध समाजीक प्रश्नांवर (social work0 भूमीका घेणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी (Mumbai Dabbawala) आता निवडणुकीच्या मैदानात (election preparation) उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पक्षात न जाता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (bmc election) अपक्ष लढवण्याचा (Independent candidate) निर्णय घेण्यात आला असून प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली.

Mangesh pangare
...आणि तरुण सायकलवरून आत्महत्या रोखण्याचा संदेश घेऊन निघाला भारत भ्रमणासाठी

मुंबई महानगर पालिकेच्या नविन प्रभाग रचना जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी युती होईल की आघाडी,जागा वाटप कसे होईल याची उत्सुकता, इच्छुकांची घालमेल असे चित्र सर्वत्र दिसत आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी मात्र निवडणुकीच्या तयारीत बाजी मारली असून निवडणूक प्रचार ही सुरू केला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकासाठी प्रभाग क्रमांक 4 मधून डबेवाल्याचा मुलगा मंगेश पांगारे अपक्ष म्हणुन मुंबई महानगर पालिकेची निवडणुक लढणार आहे. त्याच्यासाठी डबेवाल्यांनी गल्लोगल्ली प्रचार फेरी काढून सर्व परिसरात प्रचाराची राळ उडवून दिली आहे. प्रभाग क्रमांक 4 मधिल प्रत्येक ईमारत,चाळ, झोपडपट्टीत शेकडो डबेवाले अहोरात्र प्रचार करत आहेत.या माध्यमातुन डबेवाल्यांनी अप्रत्यक्षरीत्या प्रचाराचा “श्रीगणेशा” केला असून त्यांचे डोळे राजकीय पक्ष काय निर्णय घेतात यांचे कडे लागले आहेत.

Mangesh pangare
मुंबईत कोरोनाची लाट ओसरतेय; दिवसभरात ६४३ नव्या रुग्णांची भर

मंगेश पांगारे हा दहिसर येथील डबेवाला दत्तात्रय पांगारे यांचा मुलगा असून त्याने डबेवाल्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट राजकारणात उडी घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्याने क्षितीज ग्रुपच्या माध्यमातुन प्रभाग क्रमांक 4 मध्ये समाजसेवेचे व्रत गेली पंधरा वर्ष हाती घेतले आहे. या पंधरा वर्षात त्याने अनेक लोकांच्या मदतीला धावून गेला आहे. त्यामुळे मतदार आपल्या मागे उभे राहतील असा त्याला विश्वास आहे.

डबेवाल्यांची नवीन पीढी सुशिक्षित आहे. त्यांना समाजीक कामाची आवड आहे. लोकांसाठी धावून जाणारा दबावाला ही मुंबई महानगर पालिकेत निवडुन गेला पाहीजे अशी धारणा विभागातील प्रत्येक डबेवाल्यांची आहे. गिरणी कामगार, माथाडी कामगार यांची मुले राजकारणात सक्रीय झाली .त्याच पार्श्वभूमीवर डबेवाल्याने ही राजकारणात प्रवेश करून आपले प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.मुंबई डबेवाला असोशिएशन या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com