Mumbai Dabbawala: महागाईचा फटका टिफिनवर! डबेवाल्यांची सेवा महागली, आता दर महिन्याला मोजावे लागणार 'इतके' रुपये
Mumbai News: मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन आणि नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टकडून सेवा सुरू असते. मात्र आता या सेवेत दरवाढ करण्यात आली असून नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
मुंबई : नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा २०० रुपयांनी महागली आहे. जूनपासून नवा दर लागू होणार आहे, अशी माहिती नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली.