
मुंबई : मॅनेजमेंट गुरू अशी जगभरात ओळख असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांची सव्वाशे वर्षाची ऊन, वारा, पावसातील धगधगती कारकिर्द आता मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. डोक्यावर टोपी, कपाळी टिळा आणि हातात डबा घेऊन लोकल पकडण्यासाठी धावपळ करणारे डबेवाले नेहमीच नजरेला पडतात. सेवा हीच खरी भक्ती म्हणून काम करणा-या या डबेवाल्यांची मेहनत, त्यामगील चिकाटी आणि वेळेची घातली जाणारी सांगड याची माहिती सर्वसामान्यांना मिळावी, म्हणून राज्य सरकारच्या मदतीने वांद्रे पश्चिमेकडील कार्टर रोडवर मुंबई डबेवाला आंतराष्ट्रीय अनुभव केंद्र (एक्सपिरियन्स सेंटर) साकारण्यात आले आहे.