esakal | Mumbai: महाराष्ट्र बंदला डबेवाल्यांचा पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

 मुंबई डबेवाला

मुंबई : महाराष्ट्र बंदला डबेवाल्यांचा पाठिंबा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उत्तरप्रदेश मधील लाखीमपूर येथे शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने उद्या (ता.11) महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. या बंदला मुंबई डबेवाला असोशिएशनने ही आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

मुंबई डबेवाला असोसिएशनने याविषयी आपली भूमिका जाहीर केली. त्यात ते म्हणतात की उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा “ मुंबई डबेवाला असोशिएशन” निषेध करत आहे. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने त्याची कार आंदोलक शेतकऱ्यांवर चढविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री तिथे आपला मुलगा नव्हता असा दावा करत आहेत.

हेही वाचा: पेंग्विनच्या मागे किती दिवस लागणार : आदित्य ठाकरेंचा टोला

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरण वाढत असल्याचे पाहून या मंत्रीपुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.परंतू 8 जणांचा मृत्यू झालेला असला तरी देखील म्हणावा तसा तपास पोलिसांनी केला नाही. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या (ता. महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. या महाराष्ट्र बंदला “ मुंबई डबेवाला असोशिएशन” जाहीर पाठिंबा देत आहे.

शेतकरी आणि कामगार देशाच्या विकास रथाची दोन चाके आहेत. यांचा मान सन्मान हा राखला गेलाच पाहीजे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणीत जे शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांना “ मुंबई डबेवाला असोशिएशन” च्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली ही अर्पण केली आहे.

या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांचेवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली गेली पाहीजे अशी मागणी ही मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर त्यांनी केली आहे.

loading image
go to top