esakal | दादरपाठोपाठ धारावीमध्येही एकही नवा रुग्ण नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

Coronavirus: दादरपाठोपाठ धारावीमध्येही एकही नवा रुग्ण नाही!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यापूर्वी चार वेळा धारावीमध्ये शून्य नवी रूग्णसंख्या आढळली होता

मुंबई: दादरमध्ये परवा एकही नवा रूग्ण आढळला नव्हता. त्यानंतर गेल्या २४ तासात मुंबईतील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरामध्ये एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा 6905 आहे. तर धारावी मध्ये केवळ 21 सक्रिय रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेत धारावी मध्ये पाचव्यांदा शून्य रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी 4 जुलै, 23 जून, 14 जून आणि 15 जून रोजी धारावीमध्ये एकही रुग्ण आढळला नव्हता. (Mumbai Dadar Dharavi sees zero new active coronavirus infected cases)

हेही वाचा: RTO कर्मचाऱ्यांचा उद्रेक; मुंबईसह राज्यात कामकाज ठप्प

दादर मध्ये आज 15 रुग्ण आढळले. धारावीतील एकूण रुग्णसंख्या 9716 झाली आहे. माहीम मध्ये आज 5 नवे रुग्ण सापडले असून माहीम मधील एकूण रुग्ण 10,039 झाले आहेत. जी उत्तर मध्ये आज 20 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,660 झाला आहे. मुंबईत आज 664 नवीन रुग्ण सापडले. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,26,284 इतकी झाली आहे.आज 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,00,567 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 73,85,186 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

हेही वाचा: दीडवर्षे कोरोनामुळे शिक्षणाची हानी, अझीम प्रेमजींनी व्यक्त केली चिंता

कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.8 % इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 844 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 % आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 7,816 हजारांवर आला आहे. मुंबईत आज दिवसभरात 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 573 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 पुरुष तर 4 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाचे वय 40 आणि 60 च्या दरम्यान होते.तर 8 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

loading image