धारावीत नवे ५ रुग्ण, दादरमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

मिलिंद तांबे
Tuesday, 8 September 2020

धारावीमध्ये सोमवारी दिवसभरात 5 नवीन रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे या भागातील एकूण रूग्णसंख्या 2824 इतकी झाली आहे. तर 95 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबई: धारावीमध्ये सोमवारी दिवसभरात 5 नवीन रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे या भागातील एकूण रूग्णसंख्या 2824 इतकी झाली आहे. तर 95 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दादरमध्ये सोमवारी 32 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 2793 इतकी झाली आहे.   451 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये सोमवारी 39 नवीन रुग्णांची भर पडल्यानं रुग्णांची संख्या 2482 इतकी झाली.  396 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावी,दादर,माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात सोमवारी 76 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 8,099 वर पोहोचला आहे.  आतापर्यंत 511 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 2,459, दादरमध्ये 2,240 तर माहीममध्ये 2,000 असे एकूण 6,699 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.   941 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचाः  चिंताजनक! ठाणे ग्रामीणमध्ये डेंगीची साथ, दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ

मुंबईत रूग्णवाढीच्या दरात वाढ

मुंबईत सोमवारी 1,788 रुग्ण आढळून आले.  मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,57,410 झाली आहे.  रूग्णवाढीच्या दरात ही वाढ झाली असून तो 0.98 वरून 1.03 वर पोहोचला आहे. मुंबईत सोमवारी 31 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,897 वर पोहोचला आहे. मुंबईत सोमवारी 1,541 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 79 टक्के इतका आहे. 
                                 
मुंबईत नोंद झालेल्या 31 मृत्यूंपैकी 25 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 21 पुरुष तर 10 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षा खालील होते. 21 रुग्णांचे वय 60 वर्षावरील होते तर 8 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

हेही वाचाः  LockdownEffect: भाड्याच्या जागांचे मार्केट रोडावले; 25 ते 30 टक्क्यांनी किंमती कमी

 कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. सोमवारी 1,541 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,25,019 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 67 दिवसांवर गेला आहे. तर 6 सप्टेंबर पर्यंत एकूण 8,34,344  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दरात वाढ होऊन तो 1.03 इतका झाला आहे. 

--------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Dadar Records 32 new cases dharavi reports Five fresh cases


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Dadar Records 32 new cases dharavi reports Five fresh cases