
Latest Mumbai News: प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षीप्रमाणे माघ श्री गणेश जयंतीपूर्वी ‘श्रीं’चे सिंदूरलेपन केले जाते.
त्यानुसार या वर्षी बुधवारपासून (ता. ११) रविवारपर्यंत (ता. १५) ही विधी करण्यात येणार आहे. सिंदूरलेपनाच्या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही, असे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने सांगण्यात आले.