मुंबईतील दहीहंडी बक्षिसांवर कोरोना आणि ईडीची पीडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहीहंडी

मुंबईतील दहीहंडी बक्षिसांवर कोरोना आणि ईडीची पीडा

मुंबई : तब्बल दोन वर्षांनंतर मुंबई शहर आणि उपनगरांत शुक्रवारी दहीहंडीचा थरार रंगणार आहे. विशेष म्हणजे सत्ताबदलानंतर आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा राजकीय दहीहंडीला उधाण आले आहे. कोरोनामुळे यंदा सार्वजनिक दहीहंडी मंडळांची संख्या घटली असून बक्षिसाचा आकडाही कमी झाल्याचे चित्र आहे. अनेक राजकीय मंडळींनी आणि पक्षांनी ईडीच्या धास्तीमुळे लाखमोलाची दहीहंडी काही हजारांवर आणली आहे. बक्षीस रकमेत यंदा ५० टक्क्यांची घट पाहायला मिळत आहे.

मुंबई भाजपतर्फे ३७० ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपतर्फे दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात होणार असला, तरी दुसरीकडे विरोधी पक्षाने आणि काही छोट्या पक्षांनी थोडी नमती बाजू घेतली आहे. ईडीच्या भीतीपोटी अनेकांनी गोविंदा पथकांना देण्यात येणारे बक्षिसाचे स्वरूप कमी केल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात आले. छोट्या पक्षांतील अनेकांनी अद्याप बक्षीस रक्कम जाहीर केलेली नाही.

दहीहंडी समन्वय समितीचे उपाध्यक्ष कमलेश भोईर म्हणाले, की मुंबईत फक्त ४० मोठ्या दहीहंडींची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनापूर्वी ७० ते १०० मोठ्या हंडी लावण्यात आल्या होत्या. आठ थराला ५० हजारांचे बक्षीस होते. यंदा त्यासाठी २५ हजार देण्यात येणार आहेत.

ठाण्यात लाखोंची बक्षिसे

1 ठाणे आणि परिसरात यंदा तब्बल एक हजार ४५६ दहीहंड्या उभारण्यात येणार असून त्यात साधारण ४५० गोविंदा पथके सहभागी होतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

2 १० थरांच्या विक्रमास २१ लाखांचे भरघोस पारितोषिक देण्यात यणार आहे. नऊ थरांसाठी एक लाखापासून ११ लाख बक्षिसापोटी देण्यात यणार आहेत.

गोविंदा पथकांसाठी प्रमुख आकर्षण

मनसेची महा दहीहंडी (अविनाश जाधव) ः ५५ लाख

स्वामी प्रतिष्ठान (शिवाजी पाटील- भाजप) ः ५१ लाख

संस्कृती प्रतिष्ठान

‘प्रो-गोविंदा’ (आमदार

प्रताप सरनाईक) ः

दहा थरांसाठी २१ लाख

धर्मवीर आनंद दिघे टेंभीनाका दहीहंडी (शिवसेना शिंदे गट) ः मुंबई-ठाण्यातील पथकांसाठी अडीच लाख. महिलांसाठी एक लाख

संकल्प दहीहंडी (आमदार रवींद्र फाटक) : आठ थरांसाठी २५ हजार

आनंद चॅरिटेबल ट्रस्ट (खासदार राजन विचारे) ः १,११,१११ रुपयांची दोन पारितोषिके. महिलांसाठी ५१ हजारांची पारितोषिके

शिवसेना मानाची दहीहंडी (वरळी) : ३,३३,३३३

श्री जयराम सेवा प्रतिष्ठान (मागाठाणे) : नऊ लाख

साई जलाराम प्रतिष्ठान बाळकूम ः नऊ थर : दोन लाख

बक्षिसे पाच थर

५ हजार रु.

सहा थर

६ ते ८ हजार रु.

आठ थर

२५ ते ५१ हजार रु.

नऊ थर

१ ते ११ लाख रु.

विश्वविक्रमी १० थर

२१ लाख रु.

Web Title: Mumbai Dahihandi Prizes Corona Ed Scourge

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..