
मुंबई : दहीसरच्या पेटपार्कचे नूतनीकरण (Dahisar pet park reconstruction) सुरु असून आता तेथे जाणाऱ्या कुत्रे-मांजरांना (Dogs-cats) पाणी पिण्यासाठी कारंजे (water fountain), येताना व जाताना पाय धुवायला जागा, भुलभुलैय्या, बसायला खुर्ची, वाढदिवस साजरा (Birthday celebrations) करण्यासाठी मस्त स्टेज, डॉक्टरकडून चेकअप (doctor check-up) अशा एकाहून एक सरस सोयी मिळतील.
दहीसरमध्ये सध्या असलेल्या या पेटपार्कमध्ये या सोयी नसल्याने त्या करण्याचे काम सुरु आहे. डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होऊन हे पार्क मोठेच आकर्षण केंद्र होईल, असे मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक एक च्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून हे उद्यान उभे राहिले आहे. येथे सध्याही रोज चारशे ते पाचशे पाळीव प्राणी येतात, शनिवारी-रविवारी तर ही संख्या आठशेच्या घरात जाते. त्यामुळे आता येथे प्राण्यांसाठी मोठा जॉगिंग ट्रॅक तसेच त्यांना मालकाशेजारी बसायला वेगळी आसनव्यवस्थाही केली जाईल. इतकेच नव्हे तर सर्वप्रथम बागेत आल्यावर आणि बागेतून जाताना पाय धुवायला व्यवस्थाही केली जाईल.
आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांचे वाढदिवस, फॅशन शो, वेगवेगळे कार्यक्रम, अगदी लग्न, बारसं करायचे असेल तरी आता तेथे एक सुसज्ज स्टेज तयार होत आहे. त्यांना पाणी पिता यावे म्हणून छोटे कारंजेही केले आहे. कुत्र्यांची शी उचलण्यासाठी पिशव्याही दिल्या जातील. त्यांच्यासाठी ओपन जिम, वेगवेगळी खेळणी, भुलभुलैय्या मार्ग अशी वेगवेगळी आकर्षणे असतील.
तेथे आठवड्यातून एकदा पशुवैद्यक तज्ञ येऊन प्राण्यांची विनामूल्य तपासणीही करेल. कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठीचे कार्यक्रमही येथेच होतील. मोठ्या कुत्र्यांना घाबरणाऱ्या छोट्या कुत्र्यांसाठीही ते भक्कम कुंपणाचा वेगळा प्ले एरिया असेल. तेथे त्यांना आवडत्या मातीत खेळता येईल, असेही अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.