मुंबईत रूग्णवाढीचा दर 1.15 टक्क्यांवर ; 2 हजार 360 नवीन रुग्णांची भर

मिलिंद तांबे
Wednesday, 23 September 2020

मुंबईत नोंद झालेल्या 52 मृत्यूंपैकी 40 जणांना दीर्घकालीन आजार होते.

मुंबई: मुंबईत 23 tतारखेला 2 हजार 360 रुग्ण सापडले. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 1 लाख 90 हजार 138 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.16 टक्क्यांवरून कमी होऊन 1.15 वर खाली आला आहे. तर 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत नोंद झालेल्या 52 मृत्यूंपैकी 40 जणांना दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 31 पुरुष, तर 21 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 52 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. 40 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. तर 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.

महत्त्वाची बातमी : तारीख होती २३ सप्टेंबर १९८१; तब्बल ३९ वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला झालेला धुवाधार तुफानी पाऊस                   

तर 1 हजार 884 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1 लाख  54 हजार 88 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 61 दिवसांवर गेला आहे. तर 22 सप्टेंबरपर्यंत एकूण 10 लाख 35 हजार 440  चाचण्या करण्यात आल्या. 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान कोव्हिड रुग्णवाढीचा दर 1.15  इतका आहे. 

मुंबईत 633 प्रतिबंधित क्षेत्र

मुंबईत 633 इमारती आणि झोपडपट्टया प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. तर सक्रिय सील इमारतींची संख्या 10 हजार 319 असून  24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 19 हजार 938 अति जोखमीचे रुग्ण आहेत.  2 हजार 228 रुग्ण कोव्हिड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

( संपादन - सुमित बागुल )

mumbai daily corona updates more than two thousand detected positive on 23rd


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai daily corona updates more than two thousand detected positive on 23rd