पालिका निवडणुकीसाठी आधी मुंबई सजणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai municipal corporation

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील मुंबईच्या सौदर्यीकरण प्रकल्पाला पालिका प्रशासनाने वेग दिला आहे.

Mumbai News : पालिका निवडणुकीसाठी आधी मुंबई सजणार

मुंबई - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील मुंबईच्या सौदर्यीकरण प्रकल्पाला पालिका प्रशासनाने वेग दिला आहे. सुशोभिकरणाच्या ८०० कामांपैकी १७० कामे पूर्ण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. निवडणुकीपूर्वी शहराचा चेहरा मोहरा बदलून मुंबईचे ब्रॅंडिंग केले जाणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई सौदर्यीकरण प्रकल्पांतर्गत 500 प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गेल्या फेब्रूवारीमध्ये करण्यात आले. त्यावेळी शिंदे यांनी मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने मुंबईच्या सौदर्यीकरणाच्या कामाला टप्प्या टप्प्याने सुरूवात केली आहे. शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच या शहराची स्वच्छता, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावरही भर दिला जात आहे. सौदर्यीकरणाची ८०० कामे पालिका प्रशासनाने हाती घेतली आहेत. त्यापैकी १७० कामे पूर्ण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

असे सुरू आहे सौदर्यीकरण

परदेशातून मुंबईत येणा-या पर्यटकांसमोर मुंबईचे ब्रॅडिंग करणे असा या सौदर्यीकरणाची हेतू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मुंबईतील उद्याने, उड्डाण पूलाखालील मोकळ्या जागेवर उद्याने तयार विकसित करणे, त्या जागांचे सुशोभिकरण करणे, विभागवार चौक, आकर्षक पदपथ तयार करणे, शहर आणि उपनगरात बांधलेल्या स्काय वॉकची रंगरंगोटी, सार्वजनिक ठिकाणांचे टप्प्या टप्प्याने सौदर्यीकरण सुरू आहे. बेस्टच्या बसवर मुंबईच्या सौदर्यीकरण प्रकल्पाच्या जाहिराती झळकत आहेत.