
Malaria, Dengue Cases Increase in Mumbai : मुंबईत पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका झपाट्याने वाढत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आकडेवारीनुसार, गेल्या चार आठवड्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचे ४,५०० हून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. खाजगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्येही रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.