esakal | मुंबईच्या विकासात सेलिब्रिटींची आडकाठी !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईच्या विकासात सेलिब्रिटींची आडकाठी !

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : जुहू येथील रस्ता रुंदीकरणासाठी बंगल्याची जागा देण्यास चार वर्षांपासून नकार देणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या बरोबरच मुंबईच्या विकासात (Mumbai Delopement) आडकाठी आणणाऱ्या सेलिब्रीटींची (Celebrities) चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वीही काही सेलिब्रेटींनी मुंबईतील काही प्रकल्पांना (Mumbai Projects) विरोध केला होता. गायिका भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी त्यांच्या पेडररोड (peddar road) येथील घरा समोरुन जाणाऱ्या उड्डाण पुलाला विरोध केला होता.हा उड्डाण पुल झाल्यास मुंबई,देश सोडून जाण्याची धमकीही त्यांनी दिली होती. (Mumbai Development Projects Celebrities obstacle is there-nss91)

2007 मध्ये या उड्डाण पुलाचे नियोजन करण्यात आले होते.मात्र,स्थानिक नागरीकयांच्यासह लता मंगेशकर यांनी यांच्या विरोधामुळे तब्बल 9 वर्ष हा प्रकल्प रेंगाळला होता.त्यानंतर 2016 मध्ये राज्य सरकारने हा प्रकल्पच रद्द केला.तेव्हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगेशकर यांच्या विरोधात रोखठोक भुमिका मांडली होती. अमिताभ यांच्या प्रतिक्षा निवासस्थाना बाहेरील संत ज्ञानेश्‍वर मार्गाचे रुंदीकरण करण्याचे नियोजन पालिकेने 2017 मध्ये केले होते.त्यासाठी अमिताभ यांच्यासह बाजूच्या काही बंगल्याची जागा मिळवण्यासाठी पालिकेने नोटीस पाठवली होती.मात्र,अद्याप ही जागा हस्तांतरीत झालेली नाही.तर,काही दिवसांपुर्वीच पालिकेने यासाठी सर्वे करण्याची सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाला केली. याविरोधातही मनसेने पोस्टर बाजी करत अमिताभ यांना मुंबईसाठी मोठे मन दाखविण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: बेकायदा विदेशी कार विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक

सेलिब्रेटींसाठी अख्खा प्रकल्पच रद्द करणे,रस्ते रुंदीकरण चार वर्ष अडून राहाणे असे प्रकार सुरु असतात.मात्र,प्रकल्पाच्या आड येणाऱ्या सामान्य नागरीकांना सरकारी,पालिकेची यंत्रणा वेगळा न्याय लावते अशी चर्चा आता सुरु झाली आहे. अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील दुसऱ्या बंगल्यात तसेच क्रिकेट पट्टू भारतरत्न सचिन तेंडूलकर याच्या वांद्रे येथील बंगल्यात चटई क्षेत्र निर्देशांकाचे उल्लंघन झाल्याबद्दल पालिकेने यापुर्वी नोटीस पाठवली आहे. नंतर संबंधीतांकडून अर्ज आल्यानंतर दंड भरुन पालिके हे उल्लंघन अधिकृत करुन घेतले होते.तर,अभिनेत्री कंगणा राणावत हिच्या वांद्रे येथील कार्यालयाच्या बेकायदा वापरावर पालिकेने एका दिवसाची नोटीस देऊन कारवाई केली होती.तर,कंगणाच्या खार येथील घरात बेकायदेशी बदल करण्यात आल्याबद्दल न्यायालयात खटला सुरु आहे.

loading image