

10th Exam Result
ESakal
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत यंदाही मुंबई विभागाने राज्यात तिसरे स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले असून राज्याच्या तुलनेत कोकण, कोल्हापूरनंतर सर्वाधिक असा ९४.९७ टक्के इतका लागला आहे. तर राज्याचा एकूण निकाल यंदा घटला असून त्यात मुंबई विभागाच्या निकालाची ०.९ टक्केंनी घट झाली आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या टक्केवारीत मात्र किंचित वाढही झाली आहे.